पुणे : शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे तसंच ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याकडं असतो. परंतु, सुमारे चार हजार सहाशे फूट उंचीवर असलेल्या रायरेश्वर पठावर जाण्याकरिता रस्ता नसल्यानं ट्रॅक्टर नेणं कठीण आहे. एवढंच नव्हे तर पठार चढून जाणंदेखील एकट्याला जिकिरीच आहे. अशा स्थितीत रायरेश्वर पठारावर राहणारे शेतकरी संतोष जंगम या शेतकऱ्यानं कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टर पठारावर न्यायचाच असा चंग बांधला. सुमारे २ टनाचा ट्रॅक्टर नेण्यासाठी चक्क शेतकऱ्यानं ट्रॅक्टरचे सर्व पार्ट बाजूला केलं. त्यानंतर हे पार्ट उंच कड्यातील लोखंडी शिडीवरून पठारावर नेले. त्यासाठी २० ते २५ ग्रामस्थांनी शेतकऱ्याला मदत केली. फक्त ट्रॅक्टरच नव्हे तर जिद्दी माणसांनी ट्रॉलीसुद्धा पठारावर नेऊन पुन्हा जोडली. शेतकऱ्याच्या जिद्दीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
Category
🗞
News