Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम
५८० सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेत. कचरा वाहतूक श्रमिक संघाने चिकाटीनं दिलेल्या लढ्याला मिळालेलं हे यश आहे. गेली २८ वर्षे कंत्राटी सफाई कामगारांसाठी सातत्याने लढणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाने २००६ मध्ये १२४०, साल २०१७ मध्ये २७०० आणि साल२०२५ मध्ये ५८० असे एकूण ४५२० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई मनपा मध्ये कायम केले आहेत. या सर्व कामागारांनी सोमवारी पालिकेसमोरील आझाद मैदानात एकत्र येत आपला हा एकजुटीचा विजय साजरा केला. 3 मार्च रोजीच्या सर्वोच्च न्यायालयानं पालिकेची याचिका रद्द करत ५८० कामगारांना पालिकेच्या सेवेमध्ये साल १९९८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आदेश कायम केला. त्यामुळे या सर्व कामगारांना साल १९९८ ते साल २००६ पर्यंत त्यांच्या वेतनात ८ नोशनल (Notional) वेतनवाढी देऊन तयार होणाऱ्या सुधारित पगारावर साल 2006 पासून ते आजपर्यंतची किमान वेतन आणि पालिकेचे वेतन यातील प्रत्यक्ष थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. या ५८० कामगारांना आता पालिकेचे कायमस्वरूपी कामगार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यातील जे कामगार मृत, अपघाती जयबंदी आणि निवृत्त झाले असतील त्यांचासुद्धा अधिकार कोर्टाने मान्य केला आहे. एकेकाळी ३० रुपये रोजावर राबलेल्या या कामगारांना आता रु.७० हजार रूपयांपेक्षा जास्त मासिक पगार मिळणार आहे. गेली २८ वर्षे मुंबई शहराची सफाई करताना यापैकी ७० कामगारांचा मृत्यू झालाय तर सुमारे ५६ कामगार निवृत्त झाले आहेत.

Category
🗞
NewsTranscript
00:00पाच्चे आइशी सफाई कामगाराना मुम्बई महापालिके मधे कायम करा असे आदेश सर्वस्च नयाल्याने जारी केलेत,
00:07कच्राव आहतुक श्रमिक संगहाने चिकाटीने दिलेले लड़्याला मिलालेला है यशाहे,
00:12या सर्व कामगारानी काल आजाद मैदानात एकतरे ये एकजूटी सा विजय साज्रा केला,
00:17गेली 28 वर्ष कंतराटी सफाई कामगारान साथी साथत्याने लड़्यार्या कच्राव आहतुक श्रमिक संगहाने
00:242006 माधे 1240, 2017 माधे 2700, 2025 माधे 580 असे एकुण 4250 कंतराटी सफाई कामगार याना मुम्बई महानगर पालिके माधे कायम केला
01:24अपनी 99 साल पसुन तेंची कोर्ट लड़ाई शुरू है