Sanjay Raut PC | लाडकी बहीण योजना फसवी, 5 लाख अर्ज बाद, राऊतांची सरकारवर टीका
Sanjay Raut : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने (Mahayuti) दिले असले तरी जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असे सांगत योग्यवेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केले. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लाडकी बहीण योजना फसवी आहे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. तर लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचे मानधन मिळालेले नाही, असा दावा देखील त्यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आज जागतिक महिला दिन आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महिलेसोबत एक कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत, आम्ही कशी महिलांची काळजी घेतो, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन नक्की प्रसिद्ध दिली जाते. पण महाराष्ट्राची जर अवस्था आपण काही महिन्यात पाहिली तर राज्यात होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत. पोलिसांवरती दबाव आणला जातो. लाडकी बहीण सारख्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत. या भूमिकेत जर सरकार असेल तर सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

Category
🗞
News