• last week
Vaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हाती 
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यावर आता त्यातील एकेक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत. देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब माझाच्या हाती लागलीय. आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा सल्ला देशमुखांनी आपल्या लेकीला दिला होता असं जबाबात म्हटलंय. विष्णू चाटे आणि संतोष देशमुखांचं फोनवरून बोलणं झालं होतं... भाऊ एवढं काय झालं? कशाला एवढं ताणता? एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर कशाला उठता असं देशमुखांनी या फोन कॉलवर चाटेला विचारल्याचं जबाबात म्हटलंय. हा फोनकॉल विष्णू चाटेचाच होता असं संतोष देशमुखांनी सांगितल्याचं वैभवीने जबाबात म्हटलंय..

Category

🗞
News

Recommended