• last week
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP Majha

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आज घेणार देशमुख कुटुंबाची भेट, मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली, हर्षवर्धन सपकाळांसह इतर पदाधिकारी होणार सहभागी
औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यात वादळ निर्माण होण्याची शक्यता, कबरी उघडून टाकण्याबाबत खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवर आक्षेप
संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चिमूर शहरात तणाव, शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशनसमोर गर्दी, आरोपीला अटक
उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'अनाजीसेना' असा उल्लेख..तर अनाजीपंतच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल
एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी, शिंदेंनी घेतलेले निर्णयसुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण
आता दुकानांच्या मराठी पाट्यानंतर,मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीत करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह..फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिले पत्रक, 
सेन्सॉर बोर्डाकडून जातीय शेरेबाजी, धमकावल्याचा ढसाळ कुटुंबाचा आरोप, मुख्यमंत्र्यांशी चर्चेंचं उद्योगमंत्र्यांचं आश्वासन, अॅट्रोसिटी दाखल करा, विरोधकांची मागणी
आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडीओ समोर...पैसे उधळताना आणि शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांचे हात-पाय तोडण्याची  धमकी देतानाचे व्हिडीओ व्हायरल...अद्याप अटक नाही..
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली, आर्थिक पाहणी अहवालातली आकडेवारी
जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल, कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता देण्यास सुरूवात

Category

🗞
News

Recommended