• last week
काँग्रेसची सदभावना रॅली मसाजोग पासून निघणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी रॅलीत होणार सहभागी.रॅलीवेळी काँग्रेस नेते घेणार संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट. 

महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी, महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत १५ मुख्य संशयीतांची चौकशी.  

इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन, सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी.

खंडणीखोर वाल्मिक कराडनंही जीवाला घाबरून दिली 15 लाखांची खंडणी, शिवराज बांगरला कराडने धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेकरवी 15 लाख दिले, दमानियांचा आरोप,  बांगरविरुद्धचा FIRही दमानियांनी केला पोस्ट.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घेतले तोंडसुख. विरोधकांनी आम्हाला शाबासकी देऊ नये, तसेच बदनामही करू नये. यावेळ त्यांनी एक शेरही म्हटला.

गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सदावर्तेंवर टीका. सदावर्ते यांनी  राज ठाकरेंवर केली होती अपशब्दात टीका.

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज, त्याचं उदात्तीकरण कशासाठी, उदयनराजेंचा सवाल, कबर काढून टाकण्याची उदयनराजेंची मागणी

Category

🗞
News

Recommended