Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
आपल्याकडे एक म्हण आहे, 'तेलही गेले आणि तूपही', अशीच अवस्था स्ध्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनची झाली आहे. एक म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पहिला सामना हरल्याचे दु:ख आणि त्यात दुसरं म्हणजे या सामन्यात विल्यमसनकडून झालेली मोठी चुक. पण या चुकीची मोठीच किंमत त्याला मोजावी लागली आहे.केनचीही ही चूक अगदी तशीच होती, जी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात केली होती. आणि रोहितने त्याची शिक्षाही भोगली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी केन विल्यमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. तोही 12 लाखांचा. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचे स्लो ओव्हर रेटचे हे पहिलेच प्रकरण असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या चूकीची पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड आणि बंदी अशा तरतुदी आहेत. दरम्यान एकंदरितच सनरायजर्स हैदराबाद संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended