Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खूप चर्चेत आहे. उमरानने मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. चार षटकात 39 धावा देत जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल या दोघांची विकेट घेतली. स्पेल दरम्यान 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. 22 वर्षीय उमरान मलिकसाठी आयपीएलपर्यंतचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. उमरानचे वडील अब्दुल मलिक हे फळ आणि भाजीपाल्याचे दुकान चालवतात. उमरानने चार वर्षांपूर्वी गुज्जर नगर येथे क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. उमरान अधूनमधून रात्री टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला जायचा. तेव्हा त्याचे वडिल त्याच्या मागे जायचे. उमरान चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती अब्दुल मलिक यांना होती. आपला मुलगा काय करतोय, यावर ते बारीक नजर ठेवून असायचे. अंडर 19 ट्रायलमध्ये यश मिळवल्यानंतर उमरान मलिकची जम्मू-काश्मीर संघात निवड झाली आणि तेव्हा त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही उमरानचे फॅन झाले आहेत. रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, ‘उमरान मलिक खूप प्रतिभावान आहे आणि तो खूप चांगला गोलंदाज आहे. उमरान मलिक हा भारतीय संघात असायला हवा. तो उच्च स्तरावर खेळण्यास तयार होईल तेव्हा तो सुपरस्टार म्हणून उदयास येईल.

Category

🥇
Sports

Recommended